मुंबई - कुसुमाग्रज जन्मदिन आणि मराठी भाषा गौरवदिनी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मराठी भाषा आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि सुप्रसिद्ध लेखक प्रा प्रवीण चोरमले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा तसेच दिवाळी अंक परंपरा काल,आज आणि उद्या या विषयावारील कामगारनेते वसंतराव होशिंग स्मृती लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ खासदार राहुल शेवाळे आणि महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते होणार आहे असे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी कळविले आहे. गुरुवार, दि २७/०२/२०२० रोजी संध्याकाळी ५.३० वा. दासावा, धुरू हॉल. पहिला मजला, दादर - पश्चिम, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार असून विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी ९३२३११७७०४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संघाचे प्रमख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.
मराठी भाषा गौरवदिनी मराठी भाषा आणि स्पर्धा परीक्षा व्याख्यान