राज्य सरकारचे मोठे निर्णय; शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे

जाह. टीव्ही आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे शाळकरी मुलांमधील दृष्टिदोषाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. या योजनेवर सुमारे २५ कोटी रुपये खर्च आहे. सध्या केंद्र शासनाच्या मराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांयतर्गत शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. या विद्यार्थ्यांची १ हजार १९५ वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोषाचे प्रमाण वाढलेले आढळले आहे. या शाळांमध्ये १ कोटी २१ लाख ६७ हजार ५८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ८ टक्के विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष असल्याचे आढळून आले. त्यामुळे दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेतपरिणामी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होईल. एका चष्म्याची सरासरी किंमत २०० रुपये असून सुमारे २५ टक्के विद्यार्थ्यांचा चष्म्याचा नंबर पुढील वर्षात बदलण्याची शक्यता असल्याने त्यासाठीदेखील खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दृष्टिदोष असलेल्या मुलांना पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहचविण्यात येईल. पैसे द्या,आणि भिंतीवर