बंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, पुढील आदेशापर्यंत: अजित पवार
पुणे: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत हा आकडा ५२ वर पोहोचला आहे. राज्य सरकारनं खबरदारी म्हणून, जीवनावश्यक सेवा वगळून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.
अजित पवार काय म्हणाले?
लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नका. लग्न समारंभाला वधू व वराकडील फक्त २५ लोक असावेत
बंदचे आदेश पुढील ३१ मार्चपर्यंत नव्हे; तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील
अजित पवार काय म्हणाले?
लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नका. लग्न समारंभाला वधू व वराकडील फक्त २५ लोक असावेत
बंदचे आदेश पुढील ३१ मार्चपर्यंत नव्हे; तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील