समर्थकांमध्ये दगडफेक, दिल्लीत तणाव

नवी दिल्लीः नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (उ) विरोधक आणि समर्थकांमध्ये जाफराबाद येथे दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तर खबरदारी म्हणून दोन मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.सीएएविरोधात जाफराबादमध्ये मोठ्या संख्येत महिला आल्या होत्या. तर या सीएएच्या समर्थनात भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्त्वात मौजपूर चौकात अनेक लोक जमा झाल होते.